महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । पुणे । देशातील राहण्यायोग्य सर्वात लोकप्रिय शहरामध्ये पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर येते. या शहरात आयटी आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी संबंधित जास्त लोक येथे राहतात. पुणे शहराचा साक्षरता दर ८९.४५% येत असून येथील लोक आपल्या हक्क अधिकाराप्रती सदैव जागरुक राहतात. त्यासोबतच नियामांचे पालन देखील तेवढेच तत्परतेने करतात. परंतु, देशात कोरोनाच्या लाटेमुळे पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण गेल्या दहा दिवसांत सरासरी ३ हजारच्या जवळपास आढळून आले आहेत.
पुणे शहरामध्ये गेल्या चोविस तासात ५०९८ नवीन रुग्ण आढळून आले असून ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात नवीन रुग्ण समोर येण्याच्या यादीमध्ये पुणे शहर प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर नागपुर आणि मुंबई शहराचा समावेश होतो. यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शहर रुग्ण
पुणे 5098
नागपुर 3298
मुंबई 3063
या कारणामुळे वाढले पुणे शहरात रुग्ण
१) दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत असल्यामुळे ‘फ्लू’ची शक्यता वाढली.
२) ७०% होम क्वारंटाईन असणार्या रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली.
३) लसीकरणामुळे लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाली.
४) पुणे शहरातील वाढते शहरीकरण आणि रहदारी.
५) अचूक ट्रेसिंग आणि जास्तीतजास्त चाचणी.
६) लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, हिंडणे आणि फिरणे.
७) शहरात काम करण्यार्यांनी ग्रामीण भागात कोरोनाला पोहोचवले.
८) नवीन कोरोना स्ट्रेनमुळे रुग्णाच्या संख्येत वाढ, अद्याप ही संशोधनाची बाब आहे.