महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । पुणे । सोन्याचांदीच्या किंमती (Gold and Silver Rate) कालच्या तुलनेत वाढलेल्या पाहायला मिळतायत. सोन्यातली गुंतवणूक ही भविष्य काळासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे महागाई असली तरी सोन्या चांदीच्या दर पाहून शक्य होईल तशी खरेदी केली जाते. काल परवापर्यंत उसळी घेतलेल्या सोन्या किमतीत काल पासून घट पहायला मिळत आहे चांदीच्या किंमतीनी आज उसळी घेतली आहे.
परवा (१८ March 2021) रोजी २२ कॅरेट सोन्याची किंमत (Today Gold Price) प्रति १० ग्रॅम ४४ हजार २८० इतकी होती. काल त्यामध्ये घट झाली . आज ही किंमत प्रति 10 ग्रॅमला ४४ हजार ०६० इतकी आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत काल ४५ हजार ०७० इतकी होती. ही किंमत आज ४५ हजार ०६० इतकी झाली आहे.
चांदीच्या (Today Silver Price) बाबतीत बोलायचं झालं तर 1 किलोग्रॅम चांदीचा दर काल (१९ March २०२१ ) ६७ हजार ३०० इतका होता. आज हा दर २०० रुपयांनी वाढला आहे. आज ही किंमत ६७ हजार ५०० इतकी पोहोचली आहे.