तारक मेहताच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, २ जणांना झाली कोरोनाची लागण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २० – मुंबई – तारक मेहतामध्ये सुंदरच्या भूमिकेत असलेल्या मयूर वाकाणी आणि भिडेच्या भूमिकेत असलेल्या मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मयुरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंदार सध्या होम क्वॉरंटाईन आहे. मयुर आणि मंदार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सगळ्याच कलाकार आणि तंत्रज्ञांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुंदर आपल्याला खूपच कमी भागात पाहायला मिळतो. पण गेल्या काही दिवसांपूर्वी जेठालालचे पैसे भोगीलाल नावाचा एक व्यवसायिक देत नसतो. त्यामुळे जेठालाल त्याची गावातील जमीन विकण्याचे ठरवतो. या कथानकात सुंदरने महत्त्वाची भूमिका बजावली होती तर मंदार तारक मेहता का उल्टा चष्माच्या प्रत्येक भागात असतो.

मयुर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या चित्रीकरणानंतर अहमदाबादला त्याच्या घरी परत गेला होता. तिथे त्याला कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर त्याने कोरोनाची टेस्ट करून घेतली. त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असून मयुरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर त्याची पत्नी होम क्वॉरंटाईन आहे.

तर मंदारने कोरोनाची टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट यायच्या आधीच स्वतःला आयसोलेट केले होते. त्याची तब्येत चांगली असून त्याला कोणताही प्रकारचा त्रास होत नसल्याने तो सध्या होम क्वॉरंटाईन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *