वनडे सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज, विराटसेना पुण्यात दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २२ – पुणे – टी 20 मालिकेत इंग्लंडला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया (India vs England Odi Series) एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या वनडे मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सीरिजसाठी विराटसेना पुण्यात दाखल झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडिया पुण्याला पोहचल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (india vs england odi series 2021 team india reach at pune)

23 मार्चपासून एकदिवसीय मालिका
उभय संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील अखेरची मालिका
इंग्लंड संघाची भारत दौऱ्यामधील ही शेवटची मालिका असणार आहे. भारताने याआधी इंग्लंडला कसोटी आणि टी 20 मालिकेत पराभूत केलं आहे. त्यामुळे ही एकदिवसीय मालिका जिंकण्याचा मानस पाहुण्या इंग्लंडचा असणार आहे. तर ही वनडे मालिका जिंकून तिन्ही फॉर्मेटमध्ये इंग्लंडला पराभूत करण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. दरम्यान नुकतीच या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची 14 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 3 राखीव खेळाडूंचा समावेश आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

इंग्लंडची 14 सदस्यीय टीम
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले आणि मार्क वुड

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *