महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ – पुणे – मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत (today Gold Rate) घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. आज तर सोन्याचा दर कालच्यापेक्षाही कमी पाहायला मिळतोय. त्यामुळे गुंतवणूक दारांसाठी हे सुवर्ण संधी आहे साधारण ४५ हजार च्या आसपास १० ग्रॅम सोने भाव आहे .
गुड रिटर्न वेबसाईटनुसार २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत काल ४३,९२० रुपये होती. आज ही किंमत कमी होऊन ४२, ९१० इतकी झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची कालची किंमत ४४,९२० रुपये इतकी होती. आज यामध्ये १० रुपयांनी घट झालीय. आज हा दर ४३९१० वर येऊन पोहोचलाय.
चांदीच्या दरातही (Today Silver Rate) घट नोंदवण्यात आलीय. काल एक किलो चांदीचा दर ६५७०० इतका होता. आज यामध्ये ९०० रुपयांची घट नोंदवण्यात आलीय. हा दर आता ६४८०० इतका झाला आहे.