पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये किरकोळ घसरण ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ – मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण आता लवकरच इंधनांचे दर कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Petrol Diesel Price Today on 26 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. अशात बुधवारी तब्बल 25 दिवसांनी पेट्रोलचे दर स्वस्त झाले होते. त्यानंतर आता आज पुन्हा इंधनाचे दर घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.78 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.19 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 90.98 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92.77 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.10 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.20 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.98 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.10 रुपये प्रतिलीटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *