महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे – सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान माजवले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. लस आलेली आहे मात्र तरीही पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होताना पहायला मिळत नाही. त्यातच कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली कि सर्वप्रथम आपण गोंधळतो. नक्की काय करावे, हे समजत नाही. त्यासाठी भोसरी येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे वैद्य नीलेश लोंढे यांनी महाराष्ट्र 24 शी बोलतांना सांगितलेली अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती. अधिक माहितीसाठी त्यांनी हेल्पलाईन 7447476686 / 7776008686 क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
तुम्ही कोरोनाची टेस्ट का केली हे पहिले समजून घ्या
१. तुमच्या जवळच्या कोणाची तरी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून
२. तुम्हाला सर्दी ,खोकला ,ताप ,घश्यात खवखव ,ठसका ,जुलाब ,अंगदुखी अशी लक्षणे होती म्हणून .
१. पहिल्या कॅटेगरी मध्ये तुम्ही असाल म्हणजे काहीही त्रास नाही पण टेस्ट पॉझिटिव्ह आहे
अश्या अवस्थेत तुम्ही
# होम quarantine राहून ,
# चांगला आहार ,
# हलका व्यायाम ,
# चांगली झोप ,
# त्याबरोबर गुळण्या करणे ,
# वाफ घेणे ,
# घरात धुरी करणे ,
# इम्मुनिटी बूस्टर कषाय घेणे ,
# नस्य नाकात औषध सोडणे
# भूक चांगली असल्यास च्यवनप्राश घेणे अशा गोष्टी कराव्यात घ्यावी .
शरीराकडे लक्ष ठेवावे १४ दिवसापर्यंत कधीही लक्षणे दिसू शकतात .
# लक्षणे दिसली नाही तर १५ व्या दिवसापासून आपले रुटिन कामकाज सुरु ठेवावे ,
# जर लक्षणे दिसली तर पुढे दिलेल्या गोष्टी कराव्यात .
दुसरी कॅटेगरी यामध्ये तुम्हाला लक्षणे होती म्हणून तुमची टेस्ट केली व ती पॉझिटिव्ह आली यामध्ये परत ३ कॅटेगरी आहेत
# सौम्य लक्षणे ,
# मध्यम लक्षणे ,
# तीव्र लक्षणे
१. सौम्य लक्षणे :
आपल्याला सर्दी ,खोकला ,ठसका ,अंगदुखी ,घश्यात खवखव असे काही लक्षणे दिसत आहेत पण ती सौम्य स्वरूपाची आहेत
तेव्हा Haemogram ,ESR , CRP , Chest Xray हे करून घ्यावेत ते नॉर्मल असतील तर आपल्या फॅमिली फिजिशियन दाखवावे व त्याच्या सल्ल्याने होम quarantine राहावे व दिलेली औषधे घ्यावीत
याबरोबर आपल्याला आयुर्वेदिक उपचार घ्यावयाचे असल्यास आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याला दाखवून किंवा आपली सर्व लक्षणे सांगून औषधे मागवून घ्यावीत .
# होम quarantine राहून ,
# चांगला आहार ,
# हलका व्यायाम ,
# चांगली झोप ,
# त्याबरोबर गुळण्या करणे ,
# वाफ घेणे ,
# घरात धुरी करणे ,
# नस्य नाकात औषध सोडणे
# इम्मुनिटी बूस्टर कषाय घेणे ,
# आयुर्वेदिक औषधे
शरीराकडे लक्षणे सुरु झाल्यापासून ५,७,९,११ या दिवशी विशेष लक्ष द्यावे
# जर आपली लक्षणे कमी झालेली असेल तर काही काळजी ना करता १४ दिवसापर्यंत पूर्ण आराम करून १५ व्या दिवसापासून आपले रुटिन कामकाज सुरु ठेवावे .
# जर लक्षणे वाढली तर पुढे दिलेल्या गोष्टी कराव्यात .
२. मध्यम लक्षणे :
# जर लक्षणे वाढत असतील व Haemogram ,ESR , CRP , Chest Xray हे नॉर्मल नसतील तर
# CT Scan ,LDH ,D Dimer ,IL ६ ,Ferratin या तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्याव्यात व त्या नॉर्मल असतील
# तर शरीराकडे विशेष लक्ष ठेवावे लक्षणे कमी होत असतील तर पुन्हा ३ दिवसांनी Haemogram ,ESR , CRP , Chest Xray हे करावे व ते नॉर्मल किंवा कमी होत असेल तर चिंता करण्याचे कारण नाही तुम्ही होम quarantine कंटिन्यू करू शकता
# पण ते जर वाढत असेल तर पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने CT Scan ,LDH ,D Dimer ,IL ६ ,Ferratin करावे व ऍडमिट झालेले उत्तम .
आपल्याला आयुर्वेदिक उपचार घ्यावयाचे असल्यास आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याला दाखवून किंवा आपली सर्व लक्षणे सांगून औषधे मागवून घ्यावीत
# चांगला आहार ,
# हलका व्यायाम ,
# चांगली झोप ,
# गुळण्या करणे ,
# वाफ घेणे ,
# नस्य नाकात औषध सोडणे
# आयुर्वेदिक औषधे
३. तीव्र लक्षणे :
लक्षणे वाढत असतील व CT Scan ,LDH ,D Dimer ,IL ६ ,Ferratin हे नॉर्मल नसेल तर सरळ आपल्या सोयीने सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे व उपचार करून घ्यावा .
यासोबत आपल्याला आयुर्वेदिक उपचार घ्यावयाचे असल्यास आपल्या जवळच्या नातेवाईकाला आयुर्वेदिक वैद्याकडे पाठवून आपली सर्व लक्षणे सांगून औषधे मागवून घ्यावीत . व ती सुरु ठेवावीत
# चांगला आहार ,
# हलका व्यायाम ,
# चांगली झोप ,
# गुळण्या करणे ,
# वाफ घेणे ,
# नस्य नाकात औषध सोडणे
# आयुर्वेदिक औषधे
चांगला आहार
1) भूक , पचन शक्ती चांगली राहण्यासाठी भूक लागलेली असताना
# सकाळ/ संध्याकाळ फक्त मुगाचे कढण गरमगरम असे घ्यावे
# दुपारी तांदूळ भाजून एक दोनदा पेज काढलेला पातेलात शिजवलेला भात ,
# मूग तूर फोडणीचे वरण किंवा मूग आमटी ,
# पडवळ , ताजा मुळा , कोबी , फ्लॉवर , राजगिरा , लाल माठ ,गुळवेल पाने , टाकळ्याची पाने , पुनर्नव्याची पाने ,घोसाळे ( गिलके ) , दुधी , दोडका या भाज्या
# गव्हाचा फुलका , ज्वारी , नाचणी ची भाकरी याचा हलका आहार घ्यावा .
पाणी
# पाणी जेवताना थोडेथोडे आणि कडकडीत गरम फुंकून फुंकून बशीतून प्यावे .
# इतर वेळी गरमच किंवा तापवून गार केलेले प्यावे .
# खूप पाणी पिणे हे आयुर्वेदानुसार सर्दीचे कारण आहे , म्हणून ते कमीत कमी आणि तोंडातील लाळ त्यात मिसळेल असे प्यावे .
( सर्दी मद्धे कफ वाढतो कफ हा पृथ्वी आणि जल महाभूता पासून बनतो , निसर्गात पृथ्वी ( माती ) मद्धे जल ( पाणी ) घातल्यास काय होते ? चिखल ! अशी शरीरात चिखलासारखी सर्दी होण्यासाठी किंवा सर्दी असताना पार्थिव शरीरात आधीच 72 टक्के पाणी असताना , अजून पाणी प्यायल्यास भूकही मरेल आणि कफ हि वाढेल असे ऋषी मुनींचे म्हणणे आहे . अगदीच हौस असेल तर फार पाणी पिऊन आणि पाणी बंद / कमी करून बघावे .. )
# एकदोन दिवस फक्त कढण च घेतल्यास संसर्ग होण्याची शक्यता कमी होते किंवा झालेला असल्यास बरा पटकन होण्याची शक्यता असते .
# कोणत्याही आजारात लंघन ( सर्व इंद्रियांचे लंघन म्हणजे डोळ्याने पाहणे बंद कानाने ऐकणे बंद इत्यादी ) केल्याने जठराग्नी वाढून जीवन शक्ती ला बळ मिळते .
# स्वस्थ व्यक्तीला /आजारी व्यक्तीला 3-5 दिवस लंघन करण्यासाठी फारशी अडचण नसते , फक्त मधुमेही आणि इतर खूप आजारी व्यक्ती , अतिवृद्ध , गर्भिणी इत्यादींनी आधी वैद्याचा सल्ला घ्यावा .
# लंघन सुरु असताना गरम पाणी मात्र माफक पीत असावे .
हलका व्यायाम
# सांध्यांच्या हालचाली
# कवायती
# योगासने : पोटावर झोपून करावयाची आसने जास्त प्रमाणात करावीत
# प्राणायाम : अनुलोम ,विलोम ,दीर्घश्वसन
नस्य ( नाकात औषध सोडणे ) :
अणुतैल किंवा निर्विकार नस्य तैल सकाळ संध्याकाळ एक एक थेम्ब उताणे आडवे झोपून नाकात टाकत जावे .
वाफ : निर्विकार अमृतधारा स्टीमर मध्ये १ किंवा २ थेंब टाकून दिवसातून २-३ वेळा चांगली वाफ घ्यावी
गंडूष ( गुळण्या करणे ) :
त्रिफळा ,जेष्ठमध ,हरिद्रा किंवा निर्विकार गंडूष चूर्ण चूर्ण 5 gm घेऊन त्यात एक ग्लास गरम पाणी घालून. या पाण्याच्या गुळण्या दिवसातून किमान तीन वेळा तरी कराव्यात .
च्यवनप्राश : लक्षणे नसल्यास व चांगली भूक असल्यास निर्विकार च्यवनप्राश १ चमचा सकाळी उपाशीपोटी घ्यावा
औषधी सिद्ध जल
आपल्या शरीरात 72 टक्के पाणी आहे , सर्व सेल्स ना अन्न पुरवठा हा रस , रक्त या द्वारे होतो , या सेल्स मधील घटक द्रव्ये जर औषधी युक्त झाली तर सेल्य वर पॅथोजेन्स म्हणजेच जिवाणू विषाणू इत्यादी चिकटण्याची शक्यता कमी होऊ शकते . म्हणून एक लिटर कडकडीत पाण्यात हळद , दारुहळद , पुनर्नवा , भारंगी , त्रिफळा , मेषश्रुंगी , शतावरी यांचे किंवा निर्विकार इम्म्युनिटी बूस्टर कषाय यांचे समप्रमाणात घेतलेले चूर्ण 30 gm घालून 20 मिनिटे भिजत ठेवावे आणि हे पाणी पिण्यासाठी सर्वानी वापरावे .
सिद्ध जल या पाण्या ऐवजी नागरमोथा , पित्तपापडा , वाळा , चंदन , धने आणि सूंठ यांचे पाणी हि घेता येते . या दोन औषधानी जठर , यकृत , रस ,रक्त आणि फुफ्फुस यांचे आरोग्य सुधारते .
धूपन कसे करावे :
घरातून सर्वजण बाहेर पडून प्रथम एकाने गुग्गुळ ,राळ ,उद ,धूप, हळद ,निंब ,निर्गुडी जटामांसी , सूर्यफूल किंवा निर्विकार धुरीचे साहित्य भीमसेनी कापूर ,देशी गाईच्या गोवऱ्या यांचे धूपन घरात करावे . सर्व धूर दारे खिडक्या उघडून बाहेर गेल्या नंतरच मग सर्वानी घरात जावे ,
कोणताही धूर 2 सेकंदात मस्तिष्काकडे आणि 9 सेकंदात यकृता कडे जात असेल तर सेल्स मधील गॅस एक्सचेंज वरही त्याचा परिणाम घेता येईल या चष्म्यातून धूपना कडे पाहावे लागेल . गर्भिणी , तान्ही बाळे , वृद्ध व्यक्ती , ऍलर्जीवाले , दमेकरी यांनी वैद्य सल्ल्यानेच या गोष्टी कराव्यात .
आयुर्वेदिक औषधे : ती तुमच्या परिस्थितीनुसार ,लक्षणांनुसार वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत ,कोणीही मनाने ,मित्राच्या सल्ल्याने ,जाहिरातीमुळे ,मेडिकल मधून आयुर्वेदिक औषधे घेऊ नये
*काय करू नये 😗
# मन विषाद किंवा भीती बाळगू नये हा आजार काळजी करण्याचा नाही तर काळजी घेण्याचा आहे , मनांत आजाराची भीती, विषाद बाळगू नये म्हणजे प्रतिकार शक्तीला वाढायला बळ मिळते .
आपण जर घाबरलेलो असू तर आपल्या अंगातून एक गंध बाहेर पडतो तो गंध मध माश्या ओळखतात आणि ज्या अर्थी हा घाबरलेला आहे त्या अर्थी याने चुक केलेली आहे हे मध माशीला जाणवते आणि ती चावते .
घाबरून पळणारी गोष्ट हे सिहांचे भक्ष असते म्हणून तो पाठलाग करून मारतो .
या वरून दोन गोष्टी करता येतील मनातील आजारा विषयीची भीती आणि विषाद हा सेल लेव्हल वर ससेप्टीबिलिटी वाढवेल
# अति AC चा वापर टाळावा शरीराचे व आजूबाजूचे वातावरण चे तापमान २७-३८ यामध्ये राहील याची काळजी घ्यावी
# थंड , गोड , आंबट , खारट , शिळे , आंबवलेले , बेकरीचे , सडलेले ( चीज पनीर ) म्हशीचे दूध हे टाळावे .
# दूध व दुधाचे दही ताक पनीर पदार्थ ,अंडी ,फळे टाळावीत