महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ३० मार्च । होळी या सणाचे बॉलीवूड मध्ये खास स्थान आहे. होली निमित् देशभर बहुतेक सर्व लहान थोर रंग खेळत असले तरी बॉलीवूडची होळी खास चर्चेत असते. कपूर खानदानाची होली तर विशेष प्रसिध्द असून यात सामील होण्यासाठी अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री उत्सुक असतात. पण बॉलीवूड मध्ये असे अनेक स्टार कलाकार आहेत ज्यांना होळी आवडत नाही, त्यांना रंगाची भीती वाटते.
कपूर खानदानातील रणबीर हा असाच होळी दिवशी गायब राहणारा कलाकार आहे. त्याला होळी आणि रंग खेळणे अजिबात आवडत नाही. या दिवशी तो गायब असतो. ये जवानी है दिवानी चित्रपटात ‘बलम पिचकारी’ गाण्याच्या शुटींगच्या वेळी त्याची हालत फारच खराब होत असे असेही सांगतात. अभिनेत्री तापसी पन्नूच्या आईवडिलांना रंग खेळणे आवडत नसल्याने तिला होळीला रंग खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. तीही आईवडिलांसाठी रंग खेळणे टाळते. हा दिवस ती कामात व्यग्र राहून घालाविते.
अभिनेता जॉन अब्राहम यालासुद्धा होळी आणि रंग खेळणे आवडत नाही. तो म्हणतो, आजकाल रंगात रसायने वापरतात त्यामुळे त्वचेला नुकसान होतेच पण काही लोक होळीच निमित्त करून महिलांशी गैरवर्तन करतात यामुळे मला होली आवडत नाही. रणवीरसिंग यालाही चेहऱ्याला रंग लावलेला अजिबात आवडत नाही. तो म्हणतो हे रंग पर्यावरणाला नुकसान पोहोचवितात. रंग लावलेले लोक जवळ आलेले सुद्धा रणवीरला आवडत नाही. त्यामुळे होळी दिवशी तो घरात थांबत नाही.