आयात शुल्क वाढणार ; उद्यापासून मोबाईल आणि अॅक्सेसरीज महागणार,

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३१ मार्च ।उद्यापासून नवीन आर्थिक वर्षाल सुरुवात होत आहे. पुढच्या महिन्यापासून काही गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. त्यात काही गोष्टी महाग होणार आहेत. एप्रिल महिन्यापासून गाड्या ते मोबाईलपर्यंत अनेक वस्तूंच्या किंमती वाढू शकतात. स्मार्टफोनशिवाय अ‍ॅक्सेसरीजची किंमतही वाढू शकते. याबाबत यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली होती. तर पुढील महिन्यापासून मोबाईल फोन आणि अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीत किती वाढ होणार आहे ते जाणून घेऊ या.

केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती की, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर 2.5 टक्के आयात शुल्क वाढवले ​​जाईल. ज्यात मोबाइल चार्जर, मोबाइल पोर्ट, अ‍ॅडॉप्टर, बॅटरी आणि हेडफोन्स सारख्या उपकरणांचा समावेश आहे. आयात शुल्क सध्या 7.5 टक्के आहे परंतु 1 एप्रिलपासून ते वाढून 10 टक्के केले जाईल. आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर, स्मार्टफोनशिवाय इतर गॅझेटसाठी आपल्याला अधिक खर्च करावा लागणार आहे.

उद्यापासून म्हणजे 1 एप्रिलपासून आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक परिणाम प्रीमियम स्मार्टफोनवर होणार आहे. स्वस्त आणि बजेट मोबाईलची किंमत जास्त वाढणार नाही. स्वस्त फोनच्या किमतीत फारसा फरक होणार नाही. कोरोना युगात मोबाइल कंपन्यांसाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *