व्यवसाय सुरू करा ; अवघ्या पाच हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला ३० हजारांपेक्षा जास्त कमाईची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३ एप्रिल । सध्या कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) अनेकजणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या काळात अनेकांनी छोटे, मोठे व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह चालवला आहे. अगदी कमी पैशात सुरू होणाऱ्या उद्योगांनी अनेकांचे संसार सावरले आहेत. अशाच काही व्यवसायांपैकी एक आहे कुल्हड विक्रीचा (Kulhad). अवघ्या पाच हजार रुपयात हा व्यवसाय सुरू करता येतो. इतकेच नव्हे तर सरकारही या व्यवसायासाठी मदत देते. या व्यवसायातून दर महा 50 हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

सरकार देत आहे या व्यवसायाला प्रोत्साहन : आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. देशात कुठेही गेलात तरी चहाच्या टपऱ्या (Tea Stall) जागोजागी दिसतील. रेल्वे स्थानके, बस्थानके अशा ठिकाणी चहाचे अनेक स्टॉल असतात. तिथं चहा देण्यासाठी मातीच्या पेल्यांचा म्हणजेच कुल्हडचा वापर करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. चहा विक्रीसाठी प्लॅस्टिक किंवा कागदाच्या कपांचा वापरही केला जातो; पण त्यामुळे प्रदूषणही होते. ते रोखण्यासाठी सरकार चहासाठी कुल्हड वापरण्याची योजना राबवत आहे. अलीकडेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कुल्हडच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी चहाच्या टपऱ्यांवर प्लॅस्टिक किंवा कागदाच्या कपांच्या वापरावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. यामुळे आगामी काळात कुल्हडची मागणी वाढू शकते.

सरकार देते इलेक्ट्रिक चाक : मोदी सरकारनं कुल्हड निर्मितीच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार सशक्तीकारण योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार कुंभारकाम करणाऱ्या लोकांना विजेवर चालणारी मातीकामाची चाके (Electric Wheel)देते. तसेच सरकार कुल्हडची चांगल्या भावानं खरेदीही करते.
पाच हजारात सुरू करा व्यवसाय : थोडीशी जागा आणि पाच हजार रुपयांच्या भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. सरकारतर्फे हा व्यवसाय करणाऱ्याना विजेवर चालणारी मातीकामाची चाके देते. यंदा 25 हजार विजेवर चालणारी चाके देण्यात आली आहेत, अशी माहिती खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी दिली.

कुल्हड अतिशय स्वस्त आणि पर्यावरणपूरक असून, सध्या कुल्हडचा भाव 50 रुपये शेकडा आहे. लस्सी आणि दुधासाठीचे कुल्हड 150 रुपये शेकडा, तर मातीचे पेले साधारण 100 रुपये शेकडा दराने विकले जात आहेत. मागणी वाढल्यास याची विक्री किंमत वाढू शकेल. सध्या शहरात कुल्हडमधून मिळणारा चहा 15 ते 20 रुपये दराने विकला जातो. योग्य रीतीनं हा व्यवसाय केल्यास एका दिवसात एक हजार रुपयांचा नफा मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *