महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३ एप्रिल । सध्या सोन्याचे दर प्रति तोळा 44,701 रुपये आहे. आपल्या सर्वात उच्चांकी दरापेक्षा सोनं तब्बल 11,500 रुपयांनी कमी झालं आहे. ऑगस्ट, 2021 मध्ये सोनं जवळपास 56,200 रुपये या उच्चांकी दरापर्यंत पोहोचलं होतं. आता लग्न सिझन सुरू होणार आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सोन्याची मागणी वाढेल.त्यावेळी तुम्ही स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.त्यामुळे सोनं-हिरे खरेदीची हीच योग्य वेळ आहे.
तुमच्या घरात लग्नकार्य असेल आणि तुम्ही सोनं (Gold) किंवा हिऱ्याचे (Diamond) दागिने बनवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लग्नाच्या सिझनमध्ये (wedding season) सोन्याचे दर (Gold price) कमी होणार आहेत, त्यासोबतच हिरासुद्धा स्वस्त झाला आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका.
2 एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने मल्टी कमोडिटी (MCX – Multi Commodity Exchange) एक्सजेंच बंद होतं. याआधी जागतिक बाजारात सोनं वधारल्यानंतर दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोनं 881 रुपयांनी वाढून 44,701 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं. त्याआधीच्या सत्रात म्हणजे बुधवारी सोनं 43,820 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. सोन्याप्रमाणे चांदीचेही दर वाढले. चांदी प्रति किलो 1,071 रुपयांनी वाढून 63,256 रुपये झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,719 डॉलर प्रति आणि चांदी 24.48 डॉलर प्रति औंसच्या आसपासच आहे.