महाराष्ट्र २४। ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. ४ एप्रिल । वंध्यत्व (मूळ न होणे ) ही समस्या आजकाल बऱ्याच जोडप्यामध्ये पाहायला मिळते , अशाच एका रुग्णाची समस्या व त्यावर केलेले उपचार , याविषयी वैद्य सारिका लोंढे यांनी महाराष्ट्र २४ शी बोलतांना सांगितलेली माहिती .
रुग्ण : मला गर्भ राहण्यासाठी उत्तरबस्ती करायची आहे ,
वैद्या : आहो तुम्हाला तपासावे लागेल त्यानंतर ठरवावे लागेल ,
रुग्ण : ते सगळे ठीक आहे तुम्ही तपासा पण मला उत्तरबस्तीच करायची आहे.
वैद्या : का ?
रुग्ण : माझी मैत्रीण १० वेळा *IUI केले ३ वेळा IVF* केले तरी गर्भ राहिला नाही तुमच्याकडे तिने उत्तरबस्ती केली आणी पुढच्या महिन्यातच तिचा गर्भ राहिला .
असा अनुभव *उत्तरबस्ती* नंतर अनेक रुग्णान मध्ये येत असतो ,अनेक रुग्ण तर *IVF करण्याअगोदर विशेषतः ने उत्तरबस्ती करून घेत आहोत* ,काही रुग्नांच्या अनुभवानंतर IVF करण्यापूर्वी जर उत्तरबस्ती केला तर IVF Sucess रेट वाढतो असा आला आहे
उत्तरबस्ति म्हणजे गर्भाशयात औषध सोडणे
उत्तरबस्ति कोणामध्ये करतात ?
१. मुल न होणे.
२. स्त्रियांचे विकार
३. अनियमित मासिक पाळी.
४. गर्भाशय शुध्दी
५ . टयुब क्लॉक असणे.
६. PCOD
७. Harmonal Imbalance.
८. Uterine Fibroid.
९. White or Red discharge.
१०. IVF करण्यापूर्वी
उत्तरबस्ति कधी करतात ?
पाळीच्या ६, ७, ८ व्या दिवशी किंवा पाळीतुन अंगावरून जाणे थांबल्यास उत्तरबस्ती केला जातो.
उत्तर बस्ति चे फायदे
१. गर्भाशयाची शुद्धि करण्यासाठी
२. गर्भाशयातील वाढलेल्या दोषांचे शमन करण्यासाठी
३. गर्भाशयाची ताकद वाढवण्यासाठी
४. गर्भाशयातील व बीजवाहिनेतील अवरोध काढण्यासाठी
५. गर्भाशयातील उष्णता कमी करण्यासाठी
६. गर्भ राहण्यासाठी विशेष मदत होते