राशीभविष्य ; कसा असेल आजचा दिवस ,चला जाणून घेऊ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. ४ एप्रिल । रविवारचा दिवस हा भगवान सूर्याला समर्पित असतो (Rashifal Of 04 April 2021). येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील अडचणींची पूर्वकल्पना मिळाली तर दिवस अधिक चांगला घालवणं सोपं होतं. त्यासाठीच जाणून घ्या 12 राशीसाठी कसा असेल आजचा दिवस. (Rashifal Of 04 April 2021 Horoscope Astrology Of Today)-

मेष राशी
कुटुंबियांसोबत वादविवाद टाळा. व्यवसाय चांगला सुरू होईल वैवाहिक जीवनात आनंद असेल. विद्यार्थ्यांना कष्टाचे फळ मिळेल. काम वेळेवर पूर्ण कराल. नित्यक्रमात बदल होईल. नातेवाईकांना भेटाल.

वृषभ राशी
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. म्हणावा तर चांगलाही नाही आणि म्हणावा तर वाईट देखील नाही. प्रेम आणि व्यवसायात आज आपली स्थिती ठिकठाक असणार आहे , दुसर्‍याच्या बाबतीत हस्तक्षेप करणे आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते. आपल्या बोलण्यावर संयम बाळगा. अविवाहित लोकांच्या लग्नाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जोखीम घेऊ नका. तब्येत ठीक असेल.

मिथुन राशी
डोकेदुखी आणि डोळ्याच्या समस्या उद्भवतील. आज काळजी घेणं अत्यावश्यक आहे. थोडंही दुर्लक्ष करणं आपल्या आरोग्यावर बेतू शकतं. आज तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. भावंडांशी वादविवाद होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड असेल. परदेशात जाण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमिका किंवा लग्न होण्याची शक्यता आहे. आपल्याला अनैतिक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कर्क राशी
आज आपल्यासाठी प्रवासाचा योग आहे. आज आपली कमाई खूप चांगली होणार आहे. प्रेम आणि व्यवसायामध्ये काळजी घ्या , नातेवाईकांशी संबंध सुधारेल. मित्रांसह वेळ घालवा. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. तुमचे आरोग्य ठीक असेल.

सिंह राशी
अधिकारी आज आपल्यावर प्रसन्न राहणार आहेत. प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच शुभ आहे. कोणतीही समस्या उद्भवणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कोणत्याही प्रकारचे दौरे टाळा. आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ आहे. व्यावसायिकांना नफ्याच्या संधी वाढतील. जोखीम घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. मौल्यवान वस्तूंचे रक्षण करा. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कन्या राशी
आज आपलं मन अस्वस्थ राहिल. धार्मिक गोष्टींमध्ये आज थोडं लक्ष घाला. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू नका. बोलण्यावर संयम ठेवा. तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. वैवाहिक जीवन सुखी होईल. वृद्धांची काळजी घ्या. न्यायालयाचे रखडलेले काम पूर्ण करता येईल.

तुला राशी
आज आपल्याला दुखापत होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या. आज समस्यांचा सामना करावा लागणार आहे. प्रेम आणि व्यवसायात आज प्रगती होईल.आज कोणालाही कर्ज देणे टाळा. यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. समाजात प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक राशी
काम किंवा नोकरीची संधी आली असेल तरी आज ती स्वीकारू नका याचं कारणं आपलं नुकसान होऊ शकतं. प्रेमात देखील आज सावधगिरी बाळगा. कोणतीही जोखीम उचलू नका. नोकरीमुळे परदेशात जाण्याची शक्यता आहे. आज वाहन चालवताना काळजी घ्या. कुटुंबात तणावाची परिस्थिती असू शकते. जवळचा संबंध जोडला जाऊ शकतो. मनातलं बोलण्यासाठी योग्य वेळ आहे. आई- वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या 

धनु राशी
त्रूंवर आज विजय मिळवण्यात यश य़ेईल. आज आपलं आरोग्य बिघडू शकतं. आपल्यासाठी पिवळे कपडे घालणे शुभ आहे. मुलांच्या आरोग्याबद्दल चिंता वाटू शकते. आर्थिक परिस्थिती सामान्य असेल. बोलण्यावर संयम ठेवा. कृपया या दिवशी देवी कालीची पूजा करावी. नात्यात गोडवा राहील.

मकर राशी
व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ असेल. आजचा दिवस सकारात्मक असेल. आरोग्यात चढउतार होऊ शकतात. आजचा दिवस खूप आनंदी असेल. तुमची एखादी समस्या सुटेल. थांबलेले पैसे परत मिळविण्यात यश येईल. आपण तीर्थयात्रे वर जाऊ शकता. नवीन प्रकल्पावर काम कराल.

कुंभ राशी
आईची काळजी घ्या. डोक्याच्या समस्या खूप जास्त त्रासदायक असतील. प्रेमात आज परिस्थिती ठिक असेल. व्यवसायाच फायदा होईल. व्यवसायाच्या योजना इतर कोणासमोर आणू नका अन्यथा कोणी त्याचा लाभ घेऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान कमी होईल. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका.

मीन राशी
वैवाहिक जीवन आनंददायी असेल. तुमचा दिवस चांगला जाईल पालकांच्या मालमत्तेचा वाद मिटेल. लवकरच आपलं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहिल. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. आपण तीर्थयात्रेवर जाऊ शकता. धन लाभ होईल. नवीन लोकांना भेटाल. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *