बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण (Bollywood Actor Akshay Kumar tested Corona positive)

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ४ एप्रिल । राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. यात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचे नावाचा समावेश झाला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

“आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon,” असे ट्वीट अक्षय कुमार याने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *