‘आवळा’ सेवन आहे फायदेशीर ; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होते मदत ; (Amla is beneficial for boosting immunity)

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ६ एप्रिल । रोज आवळा खाल्ल्याने आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडेंट त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या कमी करतात. रस पिण्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होतात. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे कार्य देखील करते. ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत, त्यांनी आवळा रस सेवन केला पाहिजे. हा रस आपली हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते.आवळा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षाही अधिक आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. (Amla is beneficial for boosting immunity)

आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल. तुम्ही आवळा कच्चा, पावडर, लोणचे आणि रस या स्वरूपात खाऊ शकता, जे तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात येणारे हे हंगामी फळ आहे, याचे सेवन करून आपण हंगामी संक्रमणापासून दूर राहू शकता.

(टीप : ही माहिती म्हणजे उपचार नव्हे ,कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *