आता फोन कनेक्टशिवाय अ‍ॅप उपलब्ध ; WhatsApp वर येत आहे हे मजेदार फीचर,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ६ एप्रिल । व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp)एक उत्तम अपडेट येत आहे. संगणकावर व्हॉट्सअॅप चालवत असताना, आपल्याला यापुढे फोनवर पुन्हा कनेक्ट करावे लागणार नाही. एकदा आपण लॉगिन केले की आपण आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सतत चॅटिंग करण्यास सक्षम असाल. (WhatsApp is bringing fun features, now the app will be available without connecting to the phone)

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. यात नवीन वैशिष्ट्य असणार आहे. संगणकाच्या माध्यमातून गप्पा मारताना आपल्याला ते वारंवार मोबाइलशी कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. अहवालानुसार व्हॉट्सअॅप या नव्या फीचरवर काम करत आहे. दरम्यान, या नवीन वैशिष्ट्याची बीटा आवृत्ती सज्ज आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलवरून संगणकात व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) लॉग इन करताना वापरकर्त्यांना नवीन डिव्हाइस जोडण्यास सांगितले जाईल. एकदा स्वीकारल्यानंतर वापरकर्त्यास पुन्हा पुन्हा लॉगिन करण्यास सांगितले जाणार नाही.

या अहवालात असे म्हटले आहे की, कोणत्याही नवीन उपकरणातून व्हॉट्सअॅपवर प्रवेश करण्यासाठी सेटिंग्जमध्ये एक खास पर्याय देण्यात येईल. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना एकाच वेळी devices कनेक्ट करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *