महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ६ एप्रिल ।जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व छावणी परिषदेच्या हद्दीत लॉकडाऊनची मुदत 30 एप्रिल 2021 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे.
त्यानुसार प्रतिबंधित व बंद क्षेत्र व सूट आणि वगळण्यात आलेली क्षेत्रे यामध्ये कायम ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये राज्य सरकारने ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या 6 सूचनांचा अंमल पुणे जिल्ह्यातही लागू राहणार आहे. त्यामुळे पुणे शहराप्रमाणेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व स्थापना बंद राहणार असून सरकारने सुधारित केलेल्या आदेशानुसार काही नव्याने समाविष्ट केलेल्या आवश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा व आस्थापने बंद राहणार आहेत. ही सर्व आस्थापने 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत.
यामध्ये अगोदर सरकारने जाहीर केल्यानुसार ज्या आवश्यक सेवा आहेत, त्यामध्ये सरकारने आणखी सुधारित आदेश काढून नव्याने काही सेवा समाविष्ट केल्या आहेत. खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल.