महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि.१३ एप्रिल । हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी या दिवशी केल्या जातात.
पण मागील वर्षी आलेला कोविड १९ ( कोरोना) आणि ह्या वर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट , त्यामुळे होणारी जीवित हानी, व भीतीचे वातावरण , ह्या पाडव्याला आपण संकल्प करायचा तर तो आरोग्यदायी जीवन जगण्याचा केला पाहिजे , आपली प्रतिकार शक्ती कशी वाढेल व आपण ह्या आजारापासून स्वतःला आपल्या कुटुंबाला व समाजाला कसे दूर ठेऊ हा संकल्प केला पाहिजे, याच विषयी वैद्य निलेश लोंढे यांनी महाराष्ट्र २४ बोलतांना सांगितले आरोग्यदायी संकल्प कसा असावा,
नवीन वर्षाचे काही आरोग्यदायी संकल्प
# सकाळी लवकर उठेल
# उठल्यावर आयुर्वेदिक दंतमंजनाने दात घासावे .
# हळद पाण्याने गुळण्या करा
# जिव्हा निर्लेखन ने जीभ स्वच्छ घासा
# लाकडी घाणा तीळ तैलाने मालिश करा
# घाम निघेल असा व्यायाम करा सूर्यनमस्कार ,सांध्यांच्या हालचाली ,कवायती योगासने
# कोमट पाण्याने अंघोळ करा
# अंघोळ करताना मसूर डाळ हळद यांचा वापर करावा
# दिवा तीळ तैल वापरून दिवा लावावा
# ओवा ,वेखंड ,बाळंतशेपा ,वावडिंग ,देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ,भीमसेनी कापूर वापरून धुरी कराव्या
# ओंकार ,मेडिटेशन ,विश्वप्रार्थना म्हणावी
# सकाळी नाष्ट्या ऐवजी जेवण भाजी पोळी तूप सॅलड ( गाजर ,मुळा ,काकडी ,बीट )
# दुपारी भूक लागल्यास डाळ भात तूप लिंबू आमसूल ओली हळद
# संध्याकाळी भूक लागल्यास फळे व ड्राय फ्रुटस
# रात्री ७ वा भाजी भाकरी १ घास ३२ वेळा चावून खावा .दर घासाला घोटभर पाणी
# रात्री ८ नंतर टिव्ही मोबाईल व डोळ्यावर प्रखर प्रकाश पडेल अश्या गोष्टी बंद कराव्या
# जेवणानंतर तांबूल विडा सेवन
# जेवणानंतर दंतमंजन व गुळण्या करणे
# जेवणानंतर स्वकीयांसोबत शतपावली
# शरीराचा विचार करून रात्री झोपताना दूध तूप ( कफाचा त्रास ,अपचन असणाऱ्यानी घेऊ नये )
# रात्री झोपताना कानात तीळ तैल ,नाकात साजूक तूप ,डोळ्यात तूप ,तळहात तळपाय टाळू ला तूप लावावे
# १० वाजता झोपताना देवाचे नामस्मरण
# कमीत कमी आठवड्यातून १ वेळा निसर्ग सेवा
# जेवढे शक्य होईल तेवढी समाज सेवा
# स्वकीय ,नातेवाईक प्रेमळ संवाद
# ऋतूनुसार पंचकर्म शुद्धी
# शरीर व आजारानुसार च्यवनप्राश सारखी रसायने सकाळी लवकर उपाशी पोटी .
निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल
जय गणेश साम्राज्य
भोसरी पुणे
संपर्क
डॉ निलेश लोंढे
एम डी आयुर्वेद
पीएचडी ( स्कॉलर )
9881572395