पिंपरीत तुषार हिंगे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि.१५ एप्रिल ।मोरवाडीत महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन , मोरवाडी लालटोपीनगर येथील मैत्री बौद्ध विहारात महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले माजी उपमहापौर श्री तुषार हिंगे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व नंतर अभिवादन करून वंदना घेण्यात आली श्री तुषार हिंगे यांनी शुभेच्छां देताना येथील नागरिकांचे आभार मानले दर वर्षी मोठ्या थाटात जयंती साजरी करण्यात येते जयंतीची मिरवणूक बघण्यासाठी बाहेरून लोक येत असतात परंतु सध्याची परिस्थिती बघुन नागरिकांनी व मैत्री बौध्द विहारच्या पदाधिकाऱ्यांकडून जयंती मोठ्या प्रमाणात साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्त श्री दिपक भोजने आरपीआयचे युवा नेते श्री दादा शिरोळे , मैत्रि बौध्द विचारले अध्यक्ष श्री रजनीकांत गायकवाड , सचिव राम शिरोळे , रोहित काबळे , विनय कुरर्मी व इतर पदअधिकारी उपस्थित होते श्री अनिल शिंदे यांनी वंदना घेतली व श्री शिवराम वाघमारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *