‘रामायण’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । मुंबई । दि.१६ एप्रिल । ‘रामायण’ ही लोकप्रिय मालिका गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा दाखवण्यात आली होती. प्रेक्षकांनी देखील त्याला भरघोस प्रतिसाद दिला होता. ही मालिका आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती या मालिकेत सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी दिली आहे. आपल्या सोशल मीडियावरुन त्यांनी एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. त्या म्हणतात, आपल्यास सांगण्यात आनंद होत आहे की रामायण पुन्हा छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. रामायण ही मालिका गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्येही दाखवण्यात आली होती. असे वाटत आहे इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ही मालिका फक्त माझ्याच नाही तर हजारो परिवारांच्या आयुष्याचा फार मोठा भाग आहे. या आमच्यासोबत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही रामायणाबद्दलची माहिती द्या.

दररोज संध्याकाळी ७ वाजता ही मालिका स्टार भारत या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, त्यावेळी लोकांना घरीच राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता रामायण मालिकेचे पुनःप्रसारण केले होते. या पुनःप्रसारणानंतर काही दिवसांतच या मालिकेचा टीआरपी सर्वात जास्त वाढला होता. ७.७ कोटीहूनही अधिक लोकांनी ही मालिका पाहिल्याचे आकडेवारी सांगत होती. ही माहिती दूरदर्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *