Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
'कोणतंही दुखणं अंगावर काढू नका'; आरोग्यमंत्र्यांनी दिला 'हा' सल्ला - Maharashtra 24

‘कोणतंही दुखणं अंगावर काढू नका’; आरोग्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२० एप्रिल ।करोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत असताना, करोनाची ही दुसरी लाट केव्हा ओसरणार हाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात सातत्याने येत आहे. असं असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्वसामान्यांना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज ५० हजारांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सर्वसामान्य जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, कोणतंही दुखणं अंगावर काढू नका, असा सल्लाही दिला आहे.

‘थोडी जरी लक्षणं आढळली तरी चाचणी करा आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपचार करावा. कोणत्याही परिस्थितीत अंगावर दुखणं काढू नये. असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसंच, जिल्हाजिल्ह्यातील माझा आभ्यास हेच सांगतोय की उपचार घेण्यास उशीर केल्यानं रुग्ण दगावला. म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की दुखणं आंगावर काढू नका त्वरित कार्यवाही करा,’ असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *