भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त युवा संघर्ष प्रतिष्ठाण आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पिंपरी । दि.२४ एप्रिल । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतेक सर्व रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्लाझ्मा शिवाय इतर रुग्णांना रक्ताचीही गरज भासते. अपघात,शस्त्रक्रिया थायलसेमिया या रुग्णांना ही रक्ताची कमतरता जाणवत आहे. मात्र रक्ताच्या तुटवढया मुळे राज्यभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून, युवा संघर्ष प्रतिष्ठाण, अजय कांबळे, नगरसेवक शैलेश मोरे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक २३ एप्रिल रोजी आनंदनगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरामध्ये आनंदनगर परिसरातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. यावेळी ६९ रक्तपिशविंचे संकलन करण्यात आले. हे संकलन रेड प्लस ब्लड सेंटर कडे सुपूर्द करण्यात आले. या शिबीरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना नगरसेवक शैलेश मोरे ह्यांच्या वतीने राशन किट चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना नगरसेवक शैलेश मोरे व आयोजक अजय कांबळे म्हणाले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात आहेत. रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण पाहता रक्ताचा तुडवढा देखील मोठ्या प्रमाणात भासत आहे. सरकार तसेच आरोग्य यंत्रणा आपापल्या परीने उपाय योजना करीत आहेत. मात्र अनेक रक्तपेढयांत रक्ताचा तुटवढा जाणवत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर एक सामाजिक जबाबदारी व कर्तव्य समजून आम्ही या शिबिराचे आयोजन केले होते, अश्याच प्रकारचे शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करावेत असे आव्हान नगरसेवक शैलेश मोरे व आयोजक अजय कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *