महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल। पुणे । (Horoscope 25th April 2021)
मेष राशी
आरोग्यावर खास लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा नाही तर नाती खराब होतील.आज तुमची आर्थिक स्थिती मजबुत होईल. धार्मिक कार्यात मन लावा. मन शांत ठेवा. वैवाहिक जीवन आनंदी असेल.
वृषभ राशी
मित्रांना मदत केली तर तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. शुक्र आणि चंद्र दृश्यमान स्थितीत असल्यानं तुमच्या मुला मुलीच्या लग्नाचा योग येऊ शकतो. तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. हिरवा रंग घालणं शुभ होईल. .
मिथून राशी
रिलेशनशिप तसच वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतात. सुखी जीवनासाठी देवी मातेच्या मंदिरात फुलं चढवा. आर्थिक गोष्टीत फायदा मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये धैर्य ठेवा.आजचा दिवस मनाला परेशान करु शकतो. कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण असेल.
कर्क राशी
नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. मनातली गोष्ट सांगण्यासाठी ही योग्य वेळ आहे.प्रकृती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी मित्रांकडून कौतूक होईल. इतरांच्या गोष्टीत नाक खुपसणं हाणीकारक होऊ शकतं. स्वत:च्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
सिंह राशी
कौटुंबिक वाद विवादामुळे तणावाची स्थिती होऊ शकते. आरोग्याबाबत चिंता करण्याचं कारण नाही. कर्मक्षेत्रात फायदा मिळेल. व्यापार आणि प्रेम संबंधाचे मार्ग योग्य नाहीत.
कन्या राशी
विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या आयुष्यात प्रेम किंवा विवाहाचा योग जुळतोयआरोग्याची काळजी घ्या. ते बिघडू शकतं. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. कोर्टकचेरीतली कामं काही दिवस टाळा. अनैतिक गोष्टींपासून दूर रहा.
तुला राशी
आजच्या दिवशी गाईल पालक खाऊ घातलं तर बिघडलेली कामही पूर्ण होतील.व्यावसायिक कामात यश मिळेल. धार्मिक कार्य केलात तर ते शुभ असेल.
वृश्चिक राशी
सहकाऱ्यांच्या मदतीने धन प्राप्ती होईल. तुमची थांबलेली कामं पूर्ण होतील.आजचा दिवस शुभ असेल. जीवनसाथीसोबत तुमचे संबंध मजबुत होतील.
धनू राशी
आई वडीलांचं सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर होईल. त्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरु नका. जुन्या मित्रांना भेटल्यानं कार्य संपन्न होईल.आरोग्याकडे खास लक्ष असू द्या. आर्थिक फायदा मिळण्याचा योग जुळतोय.
मकर राशी
वैवाहिक जीवनात तणाव होऊ शकतो. आर्थिक गोष्टींमध्ये रिस्क घ्यावी लागेल. घाईगडबडीत कुठला फैसला घेऊ नका. विचार करुन निर्णय घ्या. नोकरीसाठी परदेशी जाण्याचा योग बनतो आहे.
कुंभ राशी
स्वत:च्या मुला मुलींच्या आरोग्यावर खास ध्यान द्या. वैवाहिक जीवन आनंदी असेल. रागावर नियंत्रण ठेवा.आज व्यापारात फायदा मिळेल. संबंधात गोडवा असेल.
मीन राशी
नव्या जॉबसाठी मन तयार होतंय. शिक्षण आणि लेखनाच्या क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थितीवर काहीही परिणाम होणार नाही. कामाच्या ठिकाणी तणावाची स्थिती राहील.पिवळा रंग घालणं शुभ होईल.