आज गुरुवार दत्तगुरूंचा वार ‘या’ राशींना आज दिवस भाग्याचाच : प्रत्येक समस्या होणार दूर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२९ एप्रिल। पुणे ।

मेष- खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मित्रांसोबत वाद होतील. पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा.हा दिवस आनंद आणि चैतन्यसह एक विशेष संदेश देईल.

वृषभ- चांगले दिवस लवकरच येतील. अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत भेट होईल.परिस्थितीवर मात करायला शिका. मनातील भीती दूर होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभ देणारा असेल. वैवाहिक जीवन चांगलं राहिल.

मिथुन- आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे.नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगली बातमी कानावर येईल.

कर्क- दिवस चांगला आहे. प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत भेटी होतील.आरोग्याकडे लक्ष द्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.

सिंह- दिवस लवकरच बदलतील. चांगल्या व्यक्तींसोबत भेटी होतील. भविष्याकडे वाटचाल करा.आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. नव्या संधी मिळतील.

कन्या- तुम्ही मांडलेलं मत योग्य आहे, हे इतरांना पटवून देण्यासाठी जीवनसाथीकडून मदत मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. दिवस चांगला आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.

तुळ- कार्यक्षेत्रात थोडी चूक झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. प्रेमसंबंध चांगले झाले तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज भासणार नाही.अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक- प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत भेटी होतील. त्यामुळे काही दिवसांत चांगली बातमी कानावर येईल.अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील.

धनु- या राशीच्या लोकांना अचनाक धन लाभ होण्याची शक्याता आहे. बाहेर फिरायला जायच्या योजना आखाल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. अधिक विचार केल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील.

मकर- मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील. सर्वत्र तुमची चर्चा असेल. अधिक प्रगती होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कामं जास्त असल्यामुळे तुम्हाला त्रास होईल.

कुंभ- गुंतवणुकीत फायदा होईल. नवीन भेटी होतील. नाती घट्ट होतील. दिवस चांगला असून व्यस्त स्वरूपाचा आहे. जीवनसथी सोबत वाद होतील.तुमचा लाजाळू स्वभाव तुम्हाला दुःखी करेल. धीट राहण्याचा प्रयत्न करा. पण ठरावीक काळानंतर सर्व ठिक होईल.

मीन- त्यांना नफा होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवन उत्तम असेल. फार काळापासून अडकलेली कामे पूर्ण करा.चांगली बातमी कानावर येईल. ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे. दिवस सामान्य आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *