राज्यात सध्या कशा प्रकारे ऑक्सीजनचा पुरवठा होतोय ; मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।अहमदाबाद । दि.१ मे । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सीजनची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध स्तरावरुन प्रयत्न होत आहेत. राज्यात सध्या कशा प्रकारे ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे.

# आज राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२७० टन इतकी आहे.

# जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त ८० मे. टन उत्पादन वाढवले आहे

# केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा १७८४ टन. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश

# राज्यात सध्या १६५० मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता.

# आजच्या घडीला खालीलप्रमाणे इतर राज्यांतून ऑक्सिजन पुरवठा

भिलाई, छत्तीसगड १०० टन (Actual allocation १३०)
बेल्लारी कर्नाटक १०० टन (Actual allocation १४०)
रिलायन्स, गुजरात १०० टन (Actual allocation १२५)

केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १८१४ मे.टन ऑक्सिजनचा कोटा निश्चित केलेला असला तरी प्रत्यक्षात कसा बसा १६५० मे.टन पर्यंत ऑक्सिजन राज्यास उपलब्ध होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *