Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
आज काटे की टक्कर ; नवी दिल्लीत मुंबई-चेन्नई समोरासमोर - Maharashtra 24

आज काटे की टक्कर ; नवी दिल्लीत मुंबई-चेन्नई समोरासमोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१ मे । आयपीएलमध्ये उद्या ४ वेळा फायनल खेळलेल्या संघांमधील लढाई तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा संघ नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जशी भिडणार आहे. याप्रसंगी मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या विजयाला, तर चेन्नई सुपरकिंग्जचा संघ सहाव्या विजयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल यात शंका नाही.

मुंबई इंडियन्सला चेन्नईतील पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांना पाच लढतींमधून फक्त दोनच लढतींमध्ये विजय मिळवता आला. पण नवी दिल्लीतील पहिल्याच लढतीत या संघाने राजस्थान रॉयल्सला हरवून या स्पर्धेत कमबॅक केले. आता उद्याही मुंबई इंडियन्सला याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.

क्विण्टॉन डी कॉक, कृणाल पांडय़ा या दोघांनीही राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत छान फलंदाजी केली. या दोघांसह मुंबई इंडियन्सच्या सर्व फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी करायला हवी. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरॉन पोलार्ड, हार्दिक पांडय़ा यांना दीपक चहर, शार्दूल ठाकूर, लुंगी एनगिडी, रवींद्र जाडेजा यांचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे.

आजची आयपीएल लढत
मुंबई इंडियन्स
विरुद्ध
चेन्नई सुपरकिंग्ज

नवी दिल्ली,
रात्री 7.30 वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *