आयपाीएल २०२१ स्थगित ; कोरोनाचा धोका कायम, CSK चा स्टार पॉझिटीव्ह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । चेन्नई । दि.४ मे । आयपीएल 2021 (IPL 2021) चा सिझन आता स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतरही या स्पर्धेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (DC) अमित मिश्रा (Amit Mishra) या दोघांचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटीव्ह आला. त्यानंतर ही स्पर्धी स्थगित करण्यात आली. आता चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॅटींग कोच मायकल हसी (Michael Hussey) कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. हसीची सोमवारी चाचणी करण्यात आली होती, मंगळवारी त्याचा रिपोर्ट आला. यापूर्वी चेन्नईचा बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी (L. Balaji) कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता.

हसीचा पहिला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली त्यावेळी देखील तोच रिपोर्ट आला. त्याची टेस्ट निगेटीव्ह येईल अशी चेन्नईच्या मॅनेजमेंटला आशा होती. यापूर्वी टीमचे सीईओ काशी विश्वनाथ यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला.

चेन्नई सुपर किंग्सची टीम सध्या दिल्लीमध्ये आहे.त्यांनी पहिल्या पाच मॅच मुंबईत खेळल्या होत्या. त्यानंतरच्या दोन मॅच दिल्लीत झाल्या. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीखाली खेळणाऱ्या या टीमनं यावर्षी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यांनी सातपैकी पाच मॅच जिंक पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर धडक मारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *