भाजप खासदारानंतर आता नेटीजन्सच्या मागणीला जोर; नितिन गडकरींकडे आरोग्य विभागाची जबाबदारी द्या;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.४ मे । देशात कोरोना संसर्गामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. आरोग्य सुविधांची वाणवा असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान कार्यालय हे कोरोना स्थिती हातळण्यात अपयशी असून हे काम युद्धपातळीवर करण्यासाठी मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे द्यावे, असं भाजप खासदारानेच म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोरोना प्रतिबंधातात्मक उपाययोजनांचं काम नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.

‘केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे खुपच नम्र असून त्यांच्या खात्याचं काम त्यांना मोकळेपणाने करू दिलं जात नाही. ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटिश साम्राज्यवाद्यानंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना व्हायरसचा सामाना करून नक्कीच टिकू शकू. परंतु आपण आता ही परिस्थिती गंभीर्यांने घेतली नाही तर, आणखी एक कोरोना लाट येईल आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करेन, त्यामुळे पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचे नाही. कोरोनाविरूद्धच्या युद्धाची जबाबदारी नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावी’ असं भाजप खासदार सुब्रमन्याम स्वामी यांनी म्हटलं आहे.

कोरोना विरूद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वतःला सिद्ध केलं आहे. असंही सुब्रमन्यम यांनी म्हटलं आहे. त्यांच्या पोस्ट नंतर ट्वीटवर नितिन गडकरी यांच्याकडे आरोग्य विभाग द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *