महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.५ मे । पिंपरी । कोरोना होऊन गेल्यावर अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या तक्रारी जाणवत आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून खालील काही लक्षणे जाणवत आहे. या बाबत बोलतांना वैद्य सारिका लोंढे यांनी महाराष्ट्र २४ बोलतांना दिलेली माहिती पुढील प्रमाणे .
१. पाळी लवकर येणे
२. अंगावरून जास्त जाणे
३. अंगावरून जास्त दिवस जाणे
४. अशक्तपणा जाणवणे
५.पाळीच्या जागी आग होणे
६. पाळीच्या जागी खाज येणे
७. गाठी जाणे
८. पाठ ,कंबर ,पाय ,पोटऱ्या दुखणे
९. अशक्तपणा जाणवणे
१०. पांढरे जाणे
कारणे :
❎ कोरोनावरील घरगुती उपाय
❎ अतिप्रमाणात पाणी घेणे
❎ गरम पाणी
❎ नाकात लिंबू पिळणे
❎ लिंबू मीठ हळदीच्या गुळण्या करणे
❎ अतिप्रमाणात वाफ घेणे
❎ ड्राय फ्रूटचे ज्यूस किंवा आंबट फळे अतिसेवन
❎ दूध ,दही ,ताक ,पनीर खाणे
❎ अंडी खाणे
❎ कडधान्य अति प्रमाणात खाणे
❎ अतिप्रमाणात मटण चिकन खाणे किंवा सूप घेणे
❎ एका जागेवर बसून असा सर्व आहार करणे ( व्यायामाचा अभाव )
❎ कधीही झोपणे ( रात्री जागरण ,सकाळी उशिरा उठणे ,दुपारी झोप )
❎ भीती ,राग ,चिडचिड
❎ घरगुती आयुर्वेदिक इलाज जसे तुलसी काढा व मसाले टाकून बनवलेला काढा ,आल्याचा चहा
❎ मनाने आयुर्वेदिक औषधे घेणे
❎ मनाने निसर्गोपचार ( गोमूत्र अर्क )
❎ मनाने ऑलोपॅथी औषधे ( व्हिटॅमिन सी ,मल्टि विट्यामिन ,अँटीबीओटीक ,स्टीरॉईड ,इकॉस्प्रिन ,)
❎मनाने होमिओपॅथी औषधे
उपाय :
✅ आहार :
सकाळी भूक असल्यास भाजी (फळभाजी ) , पोळी चमचाभर तूप ( भुकेपेक्षा दोन घास कमीच ) १ घास ३२ वेळा चावून खाणे दर घासाला उकळून ठेवलेले पाणी घ्यावे ,
✅ दुपारी भूक असल्यास डाळभात ,
✅ ५ वाजता भूक असल्यास २० काळे मनुके चघळून खाणे ,
✅ रात्री भाजी ( फळभाजी ) भाकरी ,
✅ पातळ पदार्थ म्हणून : तांदळाचे धुवण ( तांदूळ धुवून त्याचे पाणी घ्यावे ) ,मुगाचे कढण ,
✅ हलका व्यायाम : सूर्यनमस्कार ,सांध्यांच्या हालचाली ,कवायती ,योगासने ,दीर्घ श्वसन ,अनुलोम विलोम
✅ झोप : फक्त रात्री झोपावे ,दुपारी झोपू नये ,सकाळी उशिरा उठू नये
निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल तर्फे ऑनलाईन आयुर्वेदिक तपासणी सुविधा उपलब्ध
वैद्य सारिका लोंढ़े
एम ड़ी आयुर्वेद
स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ
जय गणेश साम्राज्य भोसरी