Gold Rate ; सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा झाली घसरण ; कमॉडिटी बाजारात पडझड सुरुच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.५ मे । पिंपरी । रिझर्व्ह बँकेने करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे देशव्यापी लॉकडाउनची शक्यता गडद बनली आहे. त्याचा दबाव आज कमॉडिटी बाजारावर दिसून आला. आज बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ५० रुपयांनी कमी झाला आणि तो ४६८२७ रुपये झाला. चांदीमध्ये देखील ३०० रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६९३२५ रुपये इतका खाली घसरला होता. मंगळवारी सोन्याचा भाव तब्बल ३२९ रुपयांनी घसरला होता. तर चांदीमध्ये ५५० रुपयांची घसरण झाली होती.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४५८० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५५८० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५७९० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९९९० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४३२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. त्यात २२० रुपयांची घसरण झाली आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३२० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *