आज गुरुवार या लोकांवर राहणार दत्त कृपा, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.6 मे । (Rashifal Of 06 May 2021 Horoscope Astrology Of Today)

मेष राशी
आज शिक्षण क्षेत्रात लोकांसाठी चांगला दिवस आहे. धन लाभ होईल. कुटुंबासमवेत वेळ घालवा. विशेषत: मुलांकडे लक्ष द्या. आपल्या जोडीदाराला मनातील सर्व सांगा. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे.

वृषभ राशी
आजचा दिवस सामान्य राहील.सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी कामामुळे ताण असेल. वैवाहिक जीवन सुखी होईल. आरोग्य ठीक असेल.

मिथुन राशी
आज सौदेबाजी आणि पैशांच्या बाबतीत आपल्याला इतरांचे हेतू कळतील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा दिवस अनुकूल असेल, परंतु जोखमीच्या गुंतवणुकीमुळे तोटा होण्याचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी होईल.

कर्क राशी
एखादा मित्र किंवा व्यवसायातील भागीदार पैसे कमावण्याचा नवीन मार्ग सांगू शकतो.पैशांच्या बाबतीत तुम्हाला फायदा होणार आहे. कर्मचारी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसह शांती आणि सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी होतील.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना साथीच्या आजारावेळी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस सामान्य असेल. आपल्या जोडीदारासह किंवा प्रेमिकासोबत वेळ घालवा. याने आपले संबंध मजबूत होतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील.

कन्या राशी
व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी नवीन लोकांशी चर्चा होईल. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. पैशांच्या वादापासून दूर राहा. पैसे घेण्यापूर्वी हुशारीने निर्णय घ्या. वैवाहिक जीवन सुखी होईल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

तूळ राशी
विद्यार्थ्यांसाठी हा दिवस सामान्य आहे. आज तुम्हाला पाठदुखीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.व्यवसायाच्या बाबतीत आज चांगला दिवस असेल. पैशांच्या बाबतीत भांडण होऊ शकते. वैवाहिक जीवन सामान्य राहील.

वृश्चिक राशी
कामाच्या ठिकाणी तुमचा सामान्य दिवस असेल. व्यवसायाशी संबंधित लोकांनी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. आकौटुंबिक नात्यांमध्ये पैशांमुळे किंवा जमिनीच्या वादामुळे तणाव असेल. रोग्य ठीक असेल. मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला असेल.

धनु राशी
नोकरदार लोक नोकरी सोडण्याचा विचार करु शकतात. वैवाहिक जीवन सुखी होईल. आरोग्यावर लक्ष द्या.तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी बॉसकडून पदोन्नती किंवा पगार वाढू शकतो.

मकर राशी
करिअरसाठी तुम्हाला मदत मिळेल. आधी आपल्या सीमारेषा निश्चित करा. कर्मचार्‍यांना आज थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाहन चालवताना वेग लक्षात ठेवा.व्यवसायात येणाऱ्या समस्या संपू शकतात. महत्वाच्या कामांची यादी तयार करुन कामं पूर्ण करा. दुखापत होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी
विवाहित जीवन यशस्वी होईल. श्वासोच्छवासासंबंधी आजाराने त्रस्त राहाल. म्हणून खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. तणावमुक्त होऊन विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास करावा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसह मतभेद उद्भवू शकतात.

मीन राशी
नोकरी बदलण्याची शक्यता आहे. आरोग्यावर लक्ष द्या. जुने पैसे परत मिळू शकतात. आपण आपला व्यवसाय वाढवण्यास सक्षम असाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *