मायक्रोसॉफ्ट घेऊन येत आहे खास फीचर ; ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार फायदा

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.६ मे । ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्हिडीओ मीटमध्ये जगातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्ट नवीन फीचर आणत आहे. विद्यार्थ्यांसाठी मायक्रोसॉफ्टचे व्हिडीओ मीट आणि सहाय्यकारी मंचाच्या वतीने एक फीचर आणत आहे. या फीचरमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे आणखी सोयीस्कर होणार आहे.

रीडिंग प्रोग्रेस याला म्हटले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या धड्याचा अभ्यास करण्यासाठी व्हिडीओ मीटवर रेकॉर्डिंग करण्याची परवानगी देण्यात येईल. द वर्जच्या रिपोर्टनुसार या टुलचा फायदा विद्यार्थ्यासह शिक्षकांना देखील होणार आहे. शिक्षक मायक्रोसॉफ्टच्या व्हिडीओ मीटद्वारे त्यांच्या अध्यापनाची गती, अचूकता वाढवू शकतात. ऑक्टोबरपासून 350 शिक्षकांच्या मदतीने मायक्रोसॉफ्ट याची चाचणी करणार असून हे फीचर वापरकर्त्यांसाठी मोफत असेल.

द वर्जने दिलेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्ट मीटवर एक डॅशबोर्ड शिक्षकांना दिसेल, यामध्ये प्रति मिनिट शब्द आणि अचूकतेचा दर दाखवला जाईल. यामध्ये त्यांना एका शब्दासाठी एखाद्या विद्यार्थ्याचे ऐकण्याची मुभा असेल. जर शिक्षक ऑटो डिटेक्शन सुविधा सुरु करु इच्छित नसतील तर ते बंद करु शकतात. यानंतर ते एका विद्यार्थ्याच्या वाचनाचा व्हिडीओ पाहू शकतात. हे फीचर मॅन्युअल पद्धतीने वापरता येणार आहे.

कोरोना काळात मायक्रोसॉफ्टशी ऑनलाईन शिक्षणासंदर्भात अनेक टीम जोडल्या गेल्या आहेत. 145 मिलीयन दैनिक वापरकर्ते या टीममध्ये आहेत. गेल्या वर्षभरात कंपनीने 300 सुविधा वाढवल्या आहेत. तर, आणखी 100 सुविधा वाढवण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *