‘या’ कंपन्या घेणार 5G ट्रायल ; दूरसंचार मंत्रालयाने दिली मंजूरी

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.६ मे । केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने 5G ट्रायलला मंजुरी दिली असून 5G स्पेक्ट्रमचे वाटप ज्यांना करण्यात आलंे आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे. संबंधित कंपन्या या आठवड्यापासून ट्रायल्स सुरु करतील, असे वृत्त आहे.

भारतात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या खासगी टेलिकॉम कंपन्या 5Gची ट्रायल सुरु करणार आहेत. पण, ही ट्रायल किती काळ चालेल हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण सीएनबीसी 18 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रायलमध्ये चिनी पुरवठादार सहभागी नसतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी हुवैई ही देखील या ट्रायलमध्ये सहभागी होणार नाही.भारताने जेव्हा 5G रोलआऊटवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले, त्यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे. भारतात काही महिन्यांपासून 5Gच्या अनुषंगाने हालचाली सुरु आहेत. परंतु, त्यास अधिकृत दुजोरा मिळण्याची आणि 5G परीक्षणासाठी स्पेक्ट्रमचे वाटप होण्याची प्रतिक्षा होती.

5G नेटवर्कच्या स्पर्धेत भारत विकसित देशांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. गेल्यावर्षी नेटवर्क चाचणी पुरवठादार VIAVIच्या आकडेवारीनुसार, 34 देशांमधील 378 शहरांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध आहे आणि संख्या सातत्याने वाढत आहे. त्यावेळी दक्षिण कोरियाने 85 शहरांमध्ये हे नेटवर्क सुरु केले आहे. चीनमधील 57, युएसमधील 5, युके मधील 31 शहरांमध्ये यापूर्वीच 5G नेटवर्क सेवा सुरु झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *