महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.८ मे । नागपूर । महाराष्ट्रासाठी तिसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस ५६ मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायू घेऊन नागपूरात दाखल झाली आहे . कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा तातडीनं व्हावा यासाठी देशात विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. भारतीय रेल्वेनं विविध राज्यांत आतापर्यंत २ हजार ९६० मेट्रिक टनपेक्षा अधिक द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. यामध्ये विशेष ४७ ऑक्सिजन एक्स्प्रेसनी आपलं योगदान दिलं आहे. रेल्वेनं महाराष्ट्रात १७४ मेट्रिक टन, उत्तर प्रदेशात ७२९, मध्य प्रदेशात २४९, हरयाणामध्ये ३०५, तेलंगणात १२३ तर दिल्लीत १ हजार ३३४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. याशिवाय ४०० टन द्रवरुप ऑक्सिजन असलेले २२ टँकर्स निरनिराळ्या राज्यांमध्ये रेल्वेच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे.
.