महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ९ मे । तुम्हाला एखादे बँकेचे अत्यावश्यक काम असेल आणि ज्याकरता तुम्हाला बँकेच्या शाखेत (Bank Branch) जाणं अनिवार्य असेल, तर बँका कधी बंद (Bank Holidays)आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून कोरोना लॉकडाऊन काळात होणारा खोळंबा टाळता येईल.
सुट्ट्यांबाबत सर्व राज्यांसाठी नियम वेगळे
उर्वरित महिन्यात आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या वेबसाइटनुसार काही सुट्ट्या काही ठराविक राज्यात असतात, इतर राज्यांवर त्याचा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ जर एखादा राज्यात ठराविक सण साजरा केला जातो, तर त्याची सुट्टी इतर राज्यांमध्ये दिली जाणार नाही.
-9 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
-13 मे: रमजान ईद (ईद-उल-फितर).
-14 मे: भगवान श्री परशुराम जयंती / रमजान ईद (ईद-उल-फितर) / बसवा जयंती / अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2021)
-16 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
-22 मे: चौथा शनिवार (सर्व राज्यात सुट्टी)
-23 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
-26 मे: बौद्ध पौर्णिमा.
-30 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी)