महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । भारतात वर्ष २०१९ पासून इलेक्ट्रिक चारचाकी गाड्यांचे लॉन्चिंग सुरू झाले आहे. ऑटोमोबाईल कंपन्या विशेषत: भारतीय रस्ते आणि परिस्थिती लक्षात घेऊन इलेक्ट्रिक कारची निर्मिती करत आहेत. ज्यात इंधनावर चालणा-या चारचाकी गाड्यां प्रमाणेच बैठक व्यवस्था आणि पॉवर (शक्ती) ठेवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे.यंदाच्या वर्षीही अनेक मोठ्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक चारचाकी गाड्या लॉन्च करण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना (कोविड-19) महामारीचा संकटकाळ आहे. त्यामुळे ब-याच कंपन्यांच्या अपकमिंग इलेक्ट्रिक चारचाकी गाड्यांचे लॉन्चिंग लांबणीवर पडले आहे.
भारतातील सर्वात लहान थ्री-व्हीलर इलेक्ट्रिक कार आहे. जी या वर्षी लॉन्च केली जाऊ शकते. या कारमध्ये दोन व्यक्ती बसू शकतात. कंपनीने या कारची प्राथमिक किंमत ही ठरवली आहे. जी कुठल्याही हॅचबॅक कारच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. या तीन चाकी कारची किंमत जवळपास ४.५ लाख रुपये असेल. या कारमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. या बॅटरीमुळे ही कार सिंगल चार्जमध्ये २०० किलोमीटर धावू शकते.
महिंद्रा ई एक्सयुव्ही या कारचे ऑटो एक्सपोमध्ये सादरीकरण करण्यात आले आहे. ही एक स्टायलिश इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. जी सिंगल चार्जमध्ये ३७५ किलोमीटरपर्यंत धावू शकते. ई एक्सयुव्ही ही कार महिंद्रा कंपनीची प्रसिद्ध सब-कॉम्पॅक्ट एसयूवीचा इलेक्ट्रिक अवतार आहे.
महिंद्रा ई एक्सयुव्ही कारचे डिझाइन हे एक्सयुव्ही ३०० (XUV300) सारखेच असेल. त्याचबरोबर त्यात काही महत्त्वाच्या अपडेटही असतील असे कंपनीने सांगितले आहे.
महिंद्रा ई केयुव्ही १०० या कारमध्ये १५.९ किलोवॅटचे लिक्विड कूल मोटर लावण्यात आले आहे. जे ५४ पीएस पॉवर १२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. आपल्या पॉवरफुल बॅटरीच्या जोरावर ही एसयूव्ही जवळपास १४७ किलोमीटरपर्यंत धावू शकते. या कारमध्ये फास्ट चार्जिंग फीचरची सुविधा आहे. ज्यामुळे ८० टक्के चार्जिंग होण्यासाठी केवळ ५० मिनिटांचा कालावधी लागतो. या कारची किंमत ८ से ९ लाख रुपयांदरम्यान असेल असे ऑटो तज्ज्ञांचे मत आहे.