‘वर्क फ्रॉम होम’मुळे पाठीचं दुखणं वाढलंय ?; या टिप्स फॉलो करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । वर्क फ्रॉम होममुळे आपल्याला बराचवेळ एकाच जागेवर बसून काम करावे लागत आहे. वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने आठ तासांची शिफ्ट कधी दहा तास होते, हे आपल्यालाही समजत नाही. सतत एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे अनेकांना शरीराच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये विशेष करून पाठीच्या अनेक समस्या उद्धभवत आहेत. (If you are suffering from back pain follow these tips)

घरात राहून नेमका कोणता व्यायाम करावा हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास व्यायाम सांगणार आहोत. ते केल्याने तुम्ही निरोगी राहाल तसेत तुमचे वजन देखील वाढणार नाही आणि विशेष म्हणजे वर्क फ्रॉम होममुळे सतत बसल्यामुळे तुमच्या पाठीवर जो ताण येत आहे. तो ही व्यायामांमुळे दूर होईल. बहुतेक लोकांना असे वाटते की, दोरीवरच्या उड्या मारणे फक्त लहान मुलांसाठी असते. पण प्रत्येक वयोगटातील लोकांनी दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत.

दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन झटपट कमी होते. दोरीवरच्या उड्या मारताना किमान तीन ते चार तास तुम्ही काही खाल्ले नसावे. अथवा तुमच्या पोटात त्रास होऊ शकतो.

वर्क फ्रॉम होममुळं घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेकजण कामाच्या निर्धारित तासांपेक्षा एक ते दोन तास अधिक काम करतात, असं दिसून आलं आहे. या संकल्पनेमुळं नवीन कौशल्य शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होमच्या करण्यात आलेल्या सर्वेत 64 टक्के लोकांनी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगतिले. 75 टक्के लोकांनी वर्क फ्रॉमहोममुळे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगतिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *