महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे । बॉलीवूडचे एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर यांनी वयाची साठी ओलांडली असली तरी त्यांच्या फिटनेसपुढे आजकालचे अभिनेतेदेखील फिके पडतायत. मागील काही वर्षांत अनिल कपूर आपल्या फिटनेसकडे आणखी लक्ष देत आहेत. अधूनमधून ते आपल्या वर्पआऊटचे फोटो, व्हिडिओ शेअर करतात. नुकताच त्यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय, यात ते आपले बायसेप्स दाखवताना दिसतायत. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये ‘‘लॉकडाऊन हे अनिवार्य आहे, पण यात तुम्ही काय करता हे पर्यायी आहे,’’ असे त्यांनी म्हटलेय. त्यांचा हा फिटनेस पाहून फिदा झालेल्या चाहत्यांनी ‘झक्कास’ अशी कमेंट केली असून त्यांना फिटनेस सिव्रेट सांगण्याची विनंती केली आहे. अगदी बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनीदेखील त्यांच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. ‘‘तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात,’’ असे अभिनेत्री नीना गुप्ता यांनी म्हटलंय.