Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
कांगोमध्ये घरांमध्ये शिरला लाव्हारस - Maharashtra 24

कांगोमध्ये घरांमध्ये शिरला लाव्हारस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । कांगो या आफ्रिकेतील देशातील गोमा शहरानजीक असलेल्या नीरागोंगो ज्वालामुखीमध्ये 19 वर्षांनी विस्फोट झाला आहे. या ज्वालामुखी विस्फोटामुळे पूर्ण आकाश लाल रंगात दिसून येत आहे. तसेच 10 किलोमीटरपर्यंत राख पसरली आहे. कित्येक घरांपर्यंत लाव्हारस पोहोचला आहे. महामार्ग आणि गोमा शहरातील घरांमध्येही ही राख पोहोचली आहे. ज्वालामुखी विस्फोटामुळे या भागात खळबळ उडाली आहे. हजारो लोक शेजारी देश रवांडाच्या दिशेने पळत आहेत.

गोमाच्या नजीक 3000 लोक सीमा ओलांडून येथे पोहोचल्याची माहिती रवांडा प्रशासनाने दिली आहे. दुसरीकडे कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेत तैनात भारतीय सैनिकांनी हजारो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. यापूर्वी 2002 साली हा ज्वालामुखी जागृत झाला होता, तेव्हा 250 जण मारले गेले होते. तर 1.20 लाख लोकांना स्थलांतर करावे लागले होते. ज्वालामुखीच्या या उद्रेकात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 500 हून अधिक घरे नष्ट झाली आहेत. तसेच 170 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *