IPL 2021 ; नव्या शेड्युलमुळे India vs South Africa T20 सीरिज रद्द ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २६ मे । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर आणि टी 20 वर्ल्डकप सामन्यांपूर्वी IPLचे उर्वरित सामने शेड्युल केले जाणार आहेत. या सामन्यांचे नियेजन करण्यासाठी भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज लवकर संपवण्याबाबत इंग्लंड बोर्डशी BCCIची चर्चा सुरू आहे.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये IPL2021च्या उर्वरित 31 सामन्यांचं आयोजन करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. IPLच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये होणारी भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका टी 20 सीरिज रद्द करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सीनियर अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
..
सप्टेंबर महिन्यात भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका टी 20 सीरिज खेळवली जाणार होती. मात्र सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आयपीएलचं आयोजन करण्याबाबत BCCIचं प्लॅनिंग सुरू आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आयपीएल 2021 ची फायनल 10 ऑक्टोबरला खेळली जाऊ शकते. सामने लवकर संपवण्यासाठी एका दिवसात 2 सामने खेळवले जावू शकतात. कोरोना संसर्गामुळे 2020 मध्ये युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा युएईमध्ये याचे आयोजन होऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *