महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २६ मे । नवी दिल्ली जीवन विमा कॉर्पोरेशनने (एलआयसी) हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (एचएफएल) अनेक पदांसाठी नोकर भरती काढली आहे. या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना वार्षिक 9 लाख पगार मिळू शकतो. या भरती अंतर्गत असोसिएटच्या 6 पदांवर उमेदवारांची भरती होणार आहे.
ऑनलाइन अर्ज प्रारंभ – 24 मे 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 07 जून 2021
वेतनमान – या 6 पदांवर निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेतनश्रेणी वार्षिक 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत असेल.
पात्रता – लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (एलआयसी) हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (एचएफएल) या भरतीसाठी, उमेदवारास कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे 55% गुणांसह सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा आणि अर्ज फी – या भरतीसाठी 23 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. 01 जानेवारी 2021 पर्यंत वयाच्या आधारावर वय मोजले जाईल. या भरतीसाठी कोणताही अर्ज फी आकारला जाणार नाही.
निवड प्रक्रिया – जीवन विमा महामंडळाच्या या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
https://www.lichousing.com/submit_resume.php
http://lichousing.com/index.php