Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Coronavirus : लहान मुलांना व्हाईट फंगसचा धोका जास्त - Maharashtra 24

Coronavirus : लहान मुलांना व्हाईट फंगसचा धोका जास्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे । लहान मुलांना व्हाईट फंगसचा जास्त धोका आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनामुक्त लहान मुलांना व्हाईट फंगसचा धोका पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर हृदय आणि मेंदूवर घातक दुष्परिणाम देखील होत असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या ब्लॅक, व्हाईट आणि यल्लो फंगसचा संसर्ग झपाट्यानं पसरतोय.. त्यात कोरोनातून ब-या झालेल्या लहान मुलांना व्हाईट फंगसचा जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कैंडीडायसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे व्हाईट फंगस होत असल्याचं समोर आलं आहे.

लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये हे बॅक्टेरिया जास्त आढळतात. व्हाईट फंगस फुफ्फुसांवर हल्ला करतो. नखं, त्वचा, पोट, किडनी, मेंदू, डोळे आणि तोंडावरही परिणाम होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना याचा जास्त धोका आहे. जन्मलेल्या बाळांनाही याचा धोका आहे. लहान मुलांच्या त्वचेवर डाग पडतात. जीभ पांढरी होते.

कोरोनाच्या तिस-या लाटेचा लहान मुलांना धोका आहे. त्यामुळे लहान मुलांना कुठल्याही संसर्गापासन सुरक्षित ठेवा… त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, असा आहार द्या आणि कुठलीही वेगळी लक्षणं दिसत नाहीत ना, याकडे कायम लक्ष ठेवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *