महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे । मुंबईत खास करून पश्चिम उपनगरात रहाणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. बहुचर्चित मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. या वर्षाअखेर दोन्ही मेट्रो सुरू करण्याचा MMRDA चा प्रयत्न असणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरात रहाणाऱ्या लोकांना प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुंबईतल्या पश्चिम उपनगरात वाहतुकीची वर्दळ, वाहतूक कोंडी ही एक नेहमीची गोष्ट झाली आहे. तसंच या भागातून जाणाऱ्या पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या लोकलमधील गर्दी तर जीवघेणी आहे. असं असतांना पश्चिम उपनगरासाठी दोन मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार आहेत. येत्या 31 मेला मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
असा असणार मेट्रोचा मार्ग
मेट्रो 2 ए मार्ग – दहिसर ते डी एन नगर
गजबजलेल्या लिंकिंग रोडवर मेट्रो 2 ए चांगला पर्याय ठरणार
18.589 किमी चा मार्ग, 17 मेट्रो स्थानके
मेट्रो 7 मार्ग – दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व
अत्यंत वर्दळीच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार,
16.4 किमी चा मार्ग, 17 मेट्रो स्थानके