महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३० मे ।इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) 2 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये खेळेल. या टेस्ट मॅचमध्ये उतरताच 38 वर्षांचा अंडरसन इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कूकच्या 161 टेस्ट खेळण्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. अंडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त विकेट घेणारा एकमेव फास्ट बॉलर आहे. त्याने 160 टेस्टमध्ये 614 विकेट घेतल्या आहेत. या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये अंडरसन भारताचा महान स्पिनर अनिल कुंबळेचा (Anil Kumble) विक्रम मोडू शकतो. कुंबळेने 132 टेस्टमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. या विक्रमापासून अंडरसन फक्त 6 विकेट लांब आहे.
जर अंडरसन या मोसमात न्यूझीलंडविरुद्धच्या दोन आणि भारताविरुद्धच्या पाच अशा एकूण सात टेस्ट खेळला, तर तो सर्वाधिक टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचेल. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 200 टेस्ट खेळल्या, तर रिकी पॉण्टिंग आणि स्टीव्ह वॉ 168-168 टेस्ट खेळले. जर अंडरसन या मोसमात न्यूझीलंडविरुद्धच्या दोन आणि भारताविरुद्धच्या पाच अशा एकूण सात टेस्ट खेळला, तर तो सर्वाधिक टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचेल. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 200 टेस्ट खेळल्या, तर रिकी पॉण्टिंग आणि स्टीव्ह वॉ 168-168 टेस्ट खेळले.
जर अंडरसन या मोसमात न्यूझीलंडविरुद्धच्या दोन आणि भारताविरुद्धच्या पाच अशा एकूण सात टेस्ट खेळला, तर तो सर्वाधिक टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचेल. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 200 टेस्ट खेळल्या, तर रिकी पॉण्टिंग आणि स्टीव्ह वॉ 168-168 टेस्ट खेळले.
एक लाख वर्षातही मी हा विक्रम करू शकेन असं मला वाटलं नसतं, अशी प्रतिक्रिया अंडरसनने दिली. माझं शरीर अजूनही थकलेलं नाही, असंही अंडरसन म्हणाला. 18 वर्षांपूर्वी अंडरसनने झिम्बाब्वेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. एक लाख वर्षातही मी हा विक्रम करू शकेन असं मला वाटलं नसतं, अशी प्रतिक्रिया अंडरसनने दिली. माझं शरीर अजूनही थकलेलं नाही, असंही अंडरसन म्हणाला. 18 वर्षांपूर्वी अंडरसनने झिम्बाब्वेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. एक लाख वर्षातही मी हा विक्रम करू शकेन असं मला वाटलं नसतं, अशी प्रतिक्रिया अंडरसनने दिली. माझं शरीर अजूनही थकलेलं नाही, असंही अंडरसन म्हणाला. 18 वर्षांपूर्वी अंडरसनने झिम्बाब्वेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.