Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131 शाओमीचे नवे तंत्रज्ञान ; आता 8 मिनिटात फोन चार्ज - Maharashtra 24
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । आपल्या स्मार्टफोनला चार्ज करण्याची प्रक्रिया खूप वेळखाऊ असते. पण आता यावरही शाओमीने तोडगा काढला आहे. शाओमीने नुकतेच नवे तंत्रज्ञान विकसित केले असून यायोगे स्मार्टफोन ग्राहकांना अगदी 8 मिनिटात चार्ज करता येणार आहे, असे सांगितले जात आहे. 0 ते 100 टक्के इतकी बॅटरी पूर्णपणे 8 मिनिटात चार्ज होऊ शकणार आहे. हायपर चार्ज टेक नावाने नव तंत्रज्ञान शाओमीने आणले आहे. आजवरची सर्वाधिक वेगाने मोबाईल चार्ज करणारी ही प्रणाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.