‘कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा जडेजा शोधा,’ माजी कॅप्टनचा इंग्लंडच्या टीमला सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । इंग्लंडच्या नव्या क्रिकेट सिझनला आता सुरुवात होणार आहे. इंग्लंडची टीम सर्वप्रथम न्यूझीलंड विरुद्ध 2 टेस्ट मॅचची मालिका खेळणार असून त्यानंतर टीम इंडियाविरुद्ध पाच टेस्टची मालिका खेळणार आहे. या नव्या सिझनपूर्वी माजी कॅप्टन केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने टीममधील मोठी कमतरता सांगितली आहे. इंग्लिश टीमनं कोणत्याही परिस्थितीमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सारखा खेळाडू शोधला पाहिजे. त्याचबरोबर तरुण खेळाडूंनी त्याच्या सारखं होण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला पीटरसनने दिला आहे.

पीटरसननं ‘बेटवे डॉट कॉम’ या वेबसाईटसाठी लिहिलेल्या लेखात म्हंटलं आहे की, “इंग्लंडची टीम आजवर बॅटींग करु शकणाऱ्या डावखुरा स्पिन बॉलरला शोधू शकलेली नाही. इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा रविंद्र जडेजा शोधायला हवा. जडेजाने टेस्ट, वन-डे आणि टी 20 मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंडला या प्रश्नावर उत्तर शोधलंच पाहिजे. त्यांना जडेजासारखा खेळाडू मिळाला तर त्यापेक्षा अनमोल काहीही नसेल.’

पीटरसनने इंग्लंडच्या तरुण खेळाडूंना जडेजाचा खेळ पाहून शिकण्याचा सल्ला दिला आहे. ‘जडेजाची नक्कल करा. तो एक सुपरस्टार आहे. तुम्ही तसं केलं तर इंग्लडचा टेस्ट क्रिकेटपटू म्हणून तुमची कारकिर्द मोठी असेल.’ असे पीटरसनने सांगितले.

पीटरसनने या लेखात जॅक लीच आणि डोम बीच या इंग्लंडच्या दोन स्पिनरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘लीच टेस्ट मॅच जिंकू शकत नाही हे मी दोन वर्षांपूर्वीच सांगितले होते. दुर्देवाने ते खरं ठरलं आहे. तो ग्रॅमी स्वान किंवा माँटी पानेसर सारखा नाही. इंग्लंडने तातडीने डावखुरा स्पिन बॉलर शोधला पाहिजे नाही तर ही टीमची कमकुवत बाजू असेल,’ असे पीटरसनने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *