आयपीएल पुन्हा सुरू होण्याआधीच टीमना धक्का, हे 40 खेळाडू बाहेर!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । आयपीएल 2021 (IPL 2021) चे उरलेले 31 सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. या मॅच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवण्याची तयारी बीसीसीआयने (BCCI) केली आहे. 19 किंवा 20 सप्टेंबरपासून आयपीएलला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण या सामन्यांसाठी परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आयपीएलच्या आयोजनासाठी आग्रही असणाऱ्या बीसीसीआयला परदेशी बोर्डाकडून झटका लागू शकतो. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) आधीच आपले खेळाडू आयपीएलचे उरलेले सामने खेळणार नाहीत असं सांगितलं आहे. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही (Bangladesh) आपण खेळाडूंना आयपीएलसाठी पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टी-20 वर्ल्ड कपआधी 3 ते 4 सीरिज खेळणार आहेत, त्यामुळे त्यांचं युएईला जाणंही कठीण दिसत आहे. आयपीएल 2021 मध्ये इंग्लंडचे 12 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे 18 आणि बांगलादेशचे 2 खेळाडू सहभागी झाले आहेत.

कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) ही स्पर्धा 18 सप्टेंबरला संपणार आहे, त्यामुळे जर आयपीएल 19 किंवा 20 सप्टेंबरपासून सुरू होत असेल, तर वेस्ट इंडिजचे खेळाडूही क्वारंटाईनच्या नियमामुळे लगेच उपलब्ध होऊ शकणार नाहीत. बीसीसीआयने मात्र आपण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी (West Indies Cricket Board) बोलून सीपीएल 10 दिवस आधी खेळवण्याबाबत विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशिवाय बीसीसीआय पुढच्या काही आठवड्यांमध्ये परदेशी बोर्डांसोबत खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत चर्चा करणार आहे. काही परदेशी खेळाडू उपलब्ध झाले नाहीत, तर टीमना परदेशी खेळाडूंना बदली खेळाडू विकत घेण्याची परवानगी दिली जाईल.

हे परदेशी खेळाडू होणार बाहेर?

राजस्थान रॉयल्स : मुस्तफिजुर रहमान, लियाम लिविंगस्टोन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जॉस बटलर, एंड्रयू टाय

पंजाब किंग्स : डेविड मलान, मोइजेस हेनरिक्स, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन, क्रिस गेल, निकोलस पूरन, फॅबियन एलन

कोलकाता नाइट राइडर्स : शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, ऑयन मॉर्गन, बेन कटिंग, आंद्र रसेल

चेन्नई सुपर किंग्स : मोईन अली, सॅम करन, जेसन बेहरनडोर्फ, ड्वेन ब्रावो

दिल्ली कैपिटल्स : स्टीव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, क्रिस वोक्स, टॉम करन, सॅम बिलिंग्स, शिमरोन हेटमायर

मुंबई इंडियन्स : क्रिस लिन, नॅथन कूल्टर नाइल, कायरन पोलार्ड

सनरायजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, जेसन होल्डर

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर : ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, एडम झम्पा, केन रिचर्डसन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *