महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किंमतीत (Gold Rates) काहीशी घसरण आज पाहायला मिळाली. जर तुम्ही सोनेखरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे, तुम्ही काही प्रमाणात स्वस्त सोनं सध्या खरेदी करू शकता. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange- MCX) सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.15 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर दर 49,363 प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची वायदे किंमत (Silver Price Today) 0.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. यानंतर चांदीची वायदे किंमत (Silver Price) 71,832 प्रति किलोग्रॅम झाली आहे.
24 कॅरेट सोन्याचे दर दिल्लीमध्ये प्रति तोळा 50990 रुपये या स्तरावर आहेत. मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 50990 रुपये प्रति तोळा, 50800 रुपये प्रति तोळा आणि 50980 रुपये प्रति तोळा आहेत.
यावर्षातील सॉव्हरेन गोल्ड बाँडची तिसरी सीरिज 31 मे रोजी सुरू झाली आहे. पाच दिवस याअंतर्गत सोन्याची विक्री होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गोल्ड बाँड स्कीमच्या तिसऱ्या सीरिजसाठी इश्यू प्राइस 4,889 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. अर्थात 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 4,8890 रुपये मोजावे लागतील.