यू-टय़ूबवर हे दोन भन्नाट फिचर येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । मनोरंजनासह माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी यू-टय़ूबचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. काही वेळा यू-टय़ूबचा वापर गाणी ऐकण्यासाठीदेखील केला जातो. एखादं गाणं जर आपल्याला पुनःपुन्हा ऐकायचे असेल तर? त्यासाठीच कंपनी ‘व्हिडिओ ऑन लूप’ हे फिचर घेऊन येणार आहे. सध्या या फिचरची चाचणी अँड्रॉईडवर केली जात आहे. याशिवाय ‘क्लिप व्हिडिओज’ हे दुसरे फिचर यू-टय़ूबवर येणार आहे. या फीचरच्या मदतीने व्हिडिओजच्या क्लिप बनवता येतील. या क्लिप्सची वेळ मर्यादा 60 सेकंदांची असेल. या क्लिप्स शेअरदेखील करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *