महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । निरोगी शरीरासाठी हाडंही मजबूत (Strong bones) असावी लागतात. हाडं कमजोर (Bone weakens) झाल्यामुळे अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. रोजच्या हालचाली करण्यात अडचणी यायला लागतात. संधिवातासारखा (Arthritis) त्रास वाढत्या वयानुसार किंवा अनुवांशिकतेने होऊ शकतो. त्यामुळेच आपल्या आयुष्यातल्या काही वाईट सवयी (Bad Habits) काढून टाकल्या तर, उतारवयामुळे हाडं कमजोर झाल्यामुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊयात या सवयी.
धूम्रपान
जे लोक तंबाखू खातात त्यांची बोन डेन्सिटी कमी (Low Bone Density) होऊन जाते. ज्यामुळे हाडांचे आजार व्हायला सुरुवात होते. स्मोकिंगमुळे फ्री रॅडिकल्स वाढतात. त्याने हाडांना कमजोर करणारे हार्मोन्स रिलीज व्हायला सुरुवात होते.
हालचालींचा अभाव
जे लोक दिवसभर केवळ बसून राहतात कोणतीही हालचाल करत नाहीत. त्यांना हाडांचे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. खरंतर आपले स्नायू आणि हाडं मजबूत राहण्यासाठी वर्कआऊट करणं गरजेचे आहे. त्यामुळे घरातच राहणाऱ्या लोकांनी सकाळी किंवा संध्याकाळी चालणं, वॉकिंग, व्यायाम, योगा करावा. त्यामुळे हाडं मजबूत राहतील.
मिठाचं जास्त प्रमाण
जेवणात मिठाचं प्रमाण जास्त असेल, दिवसभरामध्ये जास्त मीठ खात असाल तर, त्याने देखील हाडांना धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्यामते मिठामध्ये सोडियम असतं. जास्त प्रमाणामध्ये सोडियम शरीरात गेल्यामुळे बॉंन डेन्सिटी कमी होऊ लागते. आपल्या आहारामध्ये दिवसभरात केवळ 150 मिलीग्रॅम मीठ असायला हवं.
उन्हात जाण्यास टाळाटाळ
दिवसभर घरामध्ये राहिल्यामुळे हाडांची मजबुती कमी होते. उन्हात गेल्याने व्हिटॅमीन डी मिळतं. विटामिन डीमुळे शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण वाढतं. त्यामुळे सकाळच्यावेळी घरांमधून बाहेर पडा. सकाळच्या कोवळ्या ऊन्हाने शरीराला व्हिटॅमीन डी मिळेल. याशिवाय विटामिन डीच्या सप्लिमेंट देखील घेऊ शकता.
हाडांसाठी कॅल्शियम
कॅल्शियमने हाडं मजबूत राहतात. उलट कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाड पातळ होऊन, कमजोर व्हायला लागतात. दूध,दही या सारख्या पदार्थांनी कॅल्शियम मिळतं त्यामुळे हे पदार्य़ आवडत नसतील तरी खा. त्याबरोबर कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी सप्लिमेंट घ्या.